रोजगार

महाराष्ट्र राज्य [शासन मान्यता प्राप्त संघटना ]

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक १५१६/प्र . क्र . ३१४/१६-अ Carrer Registration

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य

स्थापना:: 02 ओक्टोंबर 2011

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्यात शासन सेवेत असलेल्या माजी सैनिकांच्या अडचणी ह्या विविध स्वरुपाच्या असल्यामुळे व विशेषता सैन्यदलातील सेवेच्या नियमाच्या संबधित असल्यामुळे राज्यात कार्यरत असलेल्या विविध संघटनेंना याबाबतचचे ज्ञान नसल्यामुळे या अडचणी मध्ये वाढ होत होती . त्यामुळे शासन सेवेत असलेल्या माजी सैनिकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध नव्हते. या अडचणीत वर्ष 2011 मध्ये अधिक वाढ झाली , राज्यातील शासन सेवेत असलेल्या माजी सैनिकांना विशेषतः जानेवारी 2006 नंतर शासन सेवेत नियुक्त झाले . त्यांच्या करिता सदर वर्ष फार वेदनादायी व असह्य वाटणारे ठरले .

याचे कारण ही तेवढेच विशेष होते. वेतननिच्छितेचे शासनाचे ध्येय धोरणावर शंका निर्माण करणारे होते, त्यामुळे सर्व माजी सैनिकांच्या वेतनातुन मोठ्या प्रमाणात कपात होणार होती . निच्छितच या गंभीर परिणामामुळे माजी सैनिकांमध्ये घबराट निर्माण झाली .

नेमके हेच कारण राज्यामध्ये पुनर्नियुक्त माजी सैनिकांची संघटना निर्माण करण्यास करणीभूत ठरले . त्यावेळेस राज्यातील सर्व जिल्हामधून मोठ्या संखेने पुनर्नियुक्त माजी सैनिक औरंगाबाद येथे एकत्र आले व यावर एकमत झाले की आपल्या हक्काची संघटना राज्यामध्ये कार्यरत असायला हवी .

उपरोक्त सर्वांनुमते शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य या नावाने कार्यरत असावी असे ठरले . व या संघटनेची स्थापना 02 ओक्टोंबर 2011 या विशेष दिनी करण्यात आली .

संघटनेचे ध्येय आणि धोरणे

ध्येय:

संघटनेचे अडीअडचणी सोडविणे जसे की वेतन निच्छीती नियमांची अंमलबजावणी करून घेणे ,
प्रशासकीय अडचणी सोडवणे
,15% आरक्षण उपलब्ध करून देणे इत्यादि .

आगामी धोरणे


1:- पदोन्नती बाबत शासनाकडे पाठपुरवठा करणे
2:-बदल्यांबाबत
3:-वर्ग 1 ,वर्ग 2 मध्ये आरक्षण उपलब्ध होणे बाबत
4:-जुने निवृती वेतन मिळणे बाबत
5:-विर नारींना तात्काळ शासन सेवेत निवृती मिळणे बाबत
6:-माजी सैनिक प्रवर्गाचे पुन्हा आरक्षण मिळणे बाबत
7:-सेवा जेष्टता मिळणे बाबत
8:-सातवा वेतन आयोगा मध्ये माजी सैनिकांना विशेष लाभ देणे बाबत


Designed by Proskill Softwares