Programs Gallery
26.1.20
कर्मयोगी प्रकाशन सोहळा सर्किट हाऊस
26.1.20
कर्मयोगी प्रकाशन सोहळा सर्किट हाऊस
19.1.2020
वृत्तमालिकेचा प्रभाव, प्रश्न सोडवणार... माजी सैनिक कल्याणमंत्री, मा. श्री दादाजी भुसे साहेब
5 July 2019
नागपूर जिल्हा चे वतीने आयोजित कारगिल युद्ध विजय दिवस निमित्ताने महाराष्ट्राचे उर्जा मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे नियोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचे वतीने अमर जवान प्रतिकृती ला मानवंदना देण्यात आली त्यानंतर त्यांना संघटनेची स्थापना व कार्याबद्दल प्रस्तावनेच्या माध्यमातून अवगत करण्यात आले. प्रस्तावना जिल्हाध्यक्ष श्री संतोष मलेवार व राज्य शासनाकडे प्रलंबित मागण्या बाबत राज्याध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर आलेगावकर यांनी अवगत केले. प्रमुख पाहुणे यांनी त्यांच्या माध्यमातून लवकरच प्रलंबित मागण्या बाबत सकारात्मक चर्चा करण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा कार्यकारिणी चे वतीने नागपूर मधील माजी सैनिक यांना संघटनेचे वतीने जिवन गौरव श्री सुधाकर तकित साहेब , समाजभुषन श्री राम कोरके, उद्योगश्री पुंडलिक सावंत तसेच पहिल्यांदा सैनिक मित्र संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यात आले त्याकरीता 1)श्री अनिल फेकरीकर वार्ताहर तरुण भारत 2) श्री जी जी बडे अधिवक्ता उच्च न्यायालय 3) सौ धनश्री गंधारे माजी सैनिक यांना स्वस्त दरात विदेश दौरा आयोजित करणार्या 4) श्री विरेन्द दहीकर सामाजिक
9/1/2019
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय वर्धा. कर्मचारी वृंद यांना 12 जानेवारी 2019 च्या सैनिक कल्याण विभागातील मेळाव्यासाठी निमंत्रण देताना
14/1/2019
सैनिक कल्याण विभाग, घोरपडी रोड, पुणे येथे दि. १२ जानेवारी २०१९ रोजी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमाकरीता राज्यातील विविध जिल्ह्यातील सैनिक कल्याण कार्यालयातील सदस्यांचे व सन्मानिय संघटनेचे राज्य अध्यक्ष व सर्व पदाधिकारी . आपले नम्र, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, शासकिय पु. मा. सैनिक संघटना, पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य
8/1/2019
दिनांक 12 जानेवारी 2019 रोजी सैनिक कल्याण विभागात कार्यरत माजी सैनिकांना संघटनेद्वारे आयोजित मेळावा चे निमंत्रण विविध जिल्हा कार्यकारणी द्वारे देण्यात येत आहे अकोला नागपूर भंडारा
9/1/2019
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अमरावती. कर्मचारी वृंद यांना 12 जानेवारी 2019 च्या सैनिक कल्याण विभागातील मेळाव्यासाठी निमंत्रण देतानां
29/11/2018
नागपुर येथील माजी सैनिक नायक (स्व.)भोयर यांचे चिरंजीव रितेश भोयर हे नागपुर ते वाघा बौर्डर या मोहिमेवर आहेत. ते वाघा बौर्डर येथून नागपूरकडे सायकल द्वारे परतिच्या मार्गावर आहेत. त्या दरम्यान त्यांनी पुण्यास भेट दिली असतांना शासकीय पुनर्नीयुक्त माजी सैनिक संघटना व सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला व सुयश चिंतण्यात आले. कर्नल ढोले साहेब यांनी त्याचा सर्वांच्या वतीने सत्कार केला. याप्रसंगी कर्नल जाधव साहेब, कमांडर पाटिल सर, राज्य कोषाध्यक्ष दीपक पाटिल, सैनिक कल्याण विभाग उपाध्यक्ष धनसिंग शीतोळे , पुणे जिल्हा उपसचिव शादिवान सर व संपुर्ण सैनिक कल्याण विभाग स्टाफ उपस्थीत होता. मा. शीतोळे सर व शादीवान सर यांनी विशेष परिश्रम घेतले. रितेश खुप शुभेच्छा.... दीपक पाटिल ... राज्य कोषाध्यक्ष.
19/12/2018
बारामती येथे जिल्हा अध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष श्री प्रकाश भिलारे व तालुकाध्यक्ष शिंदे व जिल्हा. का. सदस्य लकडे व कार्यकारणी यांनी माजी उप मुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांना संघटनेची कर्मयोगी पुस्तिका भेट देण्यात आली
03/11/2018
सैनिक बांधवांसोबत दीवाळी साजरीशासकिय पुनर्नीयुक्त माजी सैनिक संघटने तर्फे सैनिक कल्याण विभाग पुणे येथे राज्य व जिल्हा पदधिकार्यांनि सदिच्छा भेट दिली व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सभासदांना कर्मयोगी दिवाळी अंक भेट देण्यात आला. तसेच सर्वांना सदस्यत्व घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले.
08/11/2018
सैनिक बांधवांसोबत दीवाळी साजरी
07/10/2018
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना ,वार्षिक सभा 2018
28/10/2018
रायगड येथे मुहूर्तमेड रोवण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. रायगड येथील सभेसाठी पेण येथील मानकवले फ़ार्म ही सुंदर जागा निवडण्यात आली होती. सभेला अजित न्याय निर्गुने साहेब,उपाध्यक्ष कोकण भवन, पावसकर साहेब विभागीय उपाध्यक्ष कोकण विभाग व मी उपस्थीत राहिलो. सभेस स. 11.30ला दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. प्रास्तावनेनंतर स्वागत व तद्नंतर अजित न्याय निर्गुणे साहेबांनी संघटनेची गरज का आहे व तिचे महत्व समजावून सांगितले. पावसकर साहेबांनी देखील सर्व पुनर्नीयुक्त माजी सैनिकांना आजीवन सदस्यत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. मी सुद्धा संघटनेचा इतिहास,केलेले कार्य व आजीवन सदस्यत्व या मुद्द्यांवर विचार मांडले. त्यानंतर सर्वानुमते कार्यकारिणी निवडण्यात आली. श्री बिराजदार साहेब यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. लवकरच ते सभेचे इतिवृत्त ग्रुप वर टाकतील. कार्यक्रम उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. यशस्वी आयोजनाबाद्दल टीम रायगड़चे अभिनंदन व छान व्यवस्था केल्याबद्दल आभार . Congrats RAIGAD
02/10/2018
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना ,वार्षिक सभा 2018
06/10/2018
जुनी पेन्शन हक्क संघटन यांनी आझाद मैदान येथे आयोजित कार्यक्रमात संघटनेच्या वतीने एक शासन मान्य कर्मचारी संघटना म्हणून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला व राज्यातील कार्यकारिणी व नागपूर विभागातील कार्यकारिणी यांची उपस्थिती
29/07/2018
आज रोजी दिनांक 25/7/2018 ला राज्याध्यक्ष श्री चंद्रशेखर आलेगावकर साहेब, राज्य सरचिटणीस श्री प्रकाश कुळकर्णी साहेब, राज्य मुख्यसल्लागार श्री सुधाकर तकित साहेब, मी संतोष मलेवार विभागीय उपाध्यक्ष नागपूर, यांचे उपस्थितीत श्री व्ही. व्ही बडे अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे जुनी पेन्शन योजना लागू बाबत याचीका दाखल करण्या करीता दस्तावेज सादर करण्यात आले.
31/07/2018
संघटनेच्या सातारा जिल्हा कार्यकारणीद्वारे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला, यामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन शासनाने ठरवून दिलेल्या ध्येय बद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केले या कामगिरीबद्दल सातारा जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन.
29/07/2018
बीड जिल्हा बैठक २८ जुलै
09/06/2018
वर्धा जिल्हा कार्यकारणीद्वारे वर्धा जिल्यात तालुका कार्यकारणी गठीत करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे वर्धा जिल्ह्यतील तालुका देवळी येथे कार्यकारणी स्थापित करण्यात आली
13/07/2018
रविवार दि. ०१/०७/१८ रोजी पुणे जिल्ह्याची शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या पुणे जिल्ह्यची वार्षिक सर्वसाधारण सभा खुप आनंदी वातावरणात पार पडली. या बैठकीसाठी मा. आलेगांवकर, राज्य अध्यक्ष,मा.बाजीराव देशमुख, राज्य ऊपाध्यक्ष,मा. अजय चव्हाण, सचिवमा.संजय बोराटे,कोल्हापुर विभाग ऊपाध्यक्षमा. ईंदलकर, सातारा जिल्हाध्यक्ष मा. तकित ,मुख्य सल्लागारमा.माने, मुख्य सल्लागार तसेच पुण्यातील जेष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ प्राध्यापक व विभागप्रमुख Dr. Sambarey(MD, Phd) बै.जी. शासकीयवैद्यकीय महाविद्यालय पुणे हे मान्यवर ऊपस्थित होते व त्यांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सभासदांचे पाल्य व महिला मंडळीही बहुसंख्येने उपस्थित होते. बारामती, इंदापूर, दौड सह जवळपास सर्व तालुक्यातील सभासद सहकुटुंब तसेच नोंदणी व मुद्रांक, ससून बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सैनिक कल्याण विभाग, जिल्हा परिषद,GST, पोलीससह जवळपास सर्व कार्यालयातील सभासद उपस्थित होते. श्री दिलीप जाधव यांनी सुत्रसंचालन केले